जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला - राज ठाकरे

जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला - राज ठाकरे
Raj ThackeraySaam Tv

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळात होत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येनं मनसैनिक उपस्थित आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी जनतेला संबोधीत करताना इतिहासाची अनेक पानं उलगडली. महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, अल्लावुद्दीन खिलजीनं औरंगाबादमध्ये एक लाख लोकं घेवून येतो असं सांगितलं होतं. पण हजार लोकंच होती. इतिहास वाचल्यावर कळतं. औरंगजेबाने जी पत्र पाठवलेली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) व्यक्ती नसून एक विचार आहेत. महाराजांचा विचार समाजात पसरला तर आपलं काही खरं नाही , असं औरंगजेबला (Aurangzeb) वाटायचं. व्हाट्अॅपवर फेक न्यूज असतात. आज महाराष्ट्र दिन १ मे साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. पण जो समाज इतिहास (history) विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला. त्याच्या पायाखालची जमीन सटकली. म्हणून आपल्याला थोडासा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत. आपण मराठी आहोत. आपण महाराष्ट्राचे आहोत. आपण महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. असं आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

Raj Thackeray
राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार नाही : बाळासाहेब थोरात

आजच्या सभेतही राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. माझी दोन भाषणं झाली, काय फडफडायले लागले. शरद पवार म्हणाले राज ठाकरे दोन समाजात भांडण लावत आहेत. पवार साहेब, जाती जातीमध्ये जो भेद करतायेत त्यामुळे महाराष्ट्रात दुही माजत आहे अशी टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचावित. मी सर्व पुस्तकं वाचली आहेत तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचे वाचले आहे असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

सभेअगोदर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुषाश देसाई यांनी राज ठाकरेंवरती टीका केली होती. आजची होणारी सभा ही सुपारी सभा आहे या सुपारी सभेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणाऱ्या 14 मे च्या सभेत समाचार घेतील असं औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटलं आहे ते औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसैनिकांच्या प्रशिक्षण सभेत बोलत होते. लेका दुपारपर्यंत झोपून राहतोस अन पहाटच्या भोंगाच्या काय त्रास करून घेतोस असा टोमणाही देसाई यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.