Raj Thackeray Speech: 'कोकणवासियांनो जागे व्हा...' राज ठाकरेंचा बारसू प्रकल्पाला कडाडून विरोध, पहिल्यांदाच मांडली भूमिका...

Raj Thackeray Rally In Ratnagiri: लोकप्रतिनिधींना प्रकल्प कधी येणार हे आधीच कळते, मग ते जमिनी विकत घेतात, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले...
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...

Raj Thackeray On Barsu Project: बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उध्दव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. त्यानंतर त्यांची महाडमध्ये जाहीर सभाही झाली. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा बारसू रिफायनरीला विरोध असताना राज ठाकरे यांनीही रत्नागिरीच्या सभेत पहिल्यांदाच बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray Latest News
Sushma Andhare News:'भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या...' महाडच्या सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा ही रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. "कोकणातल्या माणसांचे आश्चर्य वाटते, 100-100 एकर जमिनी जातात तेव्हा कळलं नाही, मात्र लोकप्रतिनिधींना प्रकल्प कधी येणार हे आधीच कळते, मग ते जमिनी विकत घेतात," असे म्हणत राज ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाला विरोध दर्शवला.

राज ठाकरेंनी दाखवली काताळ शिल्प...

यावेळी राज ठाकरे यांनी बारसूमधील काताळ शिल्पाचे सॅटेलाईट फोटो दाखवले. हे शिल्प पाहायला जगभरातील लोक येतात. तसेच कातळशिल्प नामशेष होणार असल्याची भीती व्यक्त करत याच्या आसपास कोणतीही डेव्हलपमेंट करता येत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

Raj Thackeray Latest News
Uddhav Thackeray Speech: मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली..., उद्धव ठाकरेंचा भाजपसह CM शिंदेंवर हल्लाबोल

तसेच "जमिनी ताब्यात घेणे म्हणजे राज्य करणे, तुम्ही तुमच्या पायाखालच्या जमिनी काढता, परप्रांतीय व्यापाऱ्याला विकता याचे भान नाही, असे म्हणत जैतापूरचा अनुऊर्जा प्रकल्पावेळी तुम्ही व्यापाऱ्याला जमिनी विकल्या, नानारला तेच झालं, बारसुलाही तेच झाले," असेही ते यावेळी म्हणाले. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com