
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे व्याही डॉ.संजय बोरुडे यांच्या जनरेशन XL पुस्तकाचा (Generation XL book) प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आणि अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी उपस्थिती दर्शवली. लहान मुलांमधील लठ्ठपणा यावर आधारीत हे पुस्तक आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या वजनाबद्दलचा मजेशीर किस्सा सांगितला. गेल्या काही वर्षात माझ्या आजारपणामुळे माझं वजन वाढलं. माझ्याकडे न येण्यासाठी तुम्ही काय काय करावं,हे सांगणारा हा पहिला डॉक्टर आहे.आता घराघरात डॉक्टर झालेत. माझं आणि बाळासाहेब यांचं वजन सारखच होतं.आता मला शारीरिक वजन कमी करून सामाजिक वजन वाढवावं लागेल, अशा शब्दांत राज यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात टीपण्णी केली.
पुस्तक प्रकाशनावेळी राज पुढे म्हणाले, मी अनेक खेळ खेळत होतो पण आता कसरत देखील करता येत नाही. आता ऑपरेशन झालं की मला पळता येणार नाही. 63 किलो वजन होतं, आता ते वाढत चाललंय.काय खावं आणि काय खाऊ नये ते आशा ताईंनी सांगितलं. त्या उत्तम सुगरण आहेत. मी घरी गेलो तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खूप जेवण बनवलं होतं. आता वजन कमी नाही केलं तर मी देखील 90 किलो पर्यंत जाईल.असंही राज ठाकरे म्हणाले.
तसंच अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही या सोहळ्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात राहतो तर मराठी बोलायला हवं. मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही, पण मी बोलतो. लहान मुलांना सांभाळणारे डॉक्टर आमच्यासाठी देव असतात. राज ठाकरे यांना बघितल्यावर असं वाटत नाही,की ते आजोबा आहेत.सगळ्यांनी आपल्या घरात लहान मुलांना आपण काय खायला देतो,याची काळजी घेतली पाहिजे. या संदर्भात ग्रामीण भागात प्रचार व्हायला हवा. यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा,अशी माझी विनंती.
Edited by - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.