Raj Thackeray Speech : मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपची युती होणार का?
MNS Raj Thackeray News
MNS Raj Thackeray NewsSaam TV

MNS Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरात (Nagpur) असून यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपची युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारला. यावर उत्तर देताना, आमचं युतीबाबत काही बोलणं झालं नाहीत. युतीबाबतच्या बातम्या मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे. (Raj Thackeray Todays News)

MNS Raj Thackeray News
Gram Panchayat Election 2022 : ५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; शिंदे गटानं खातं उघडलं

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युती होणार असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजप-मनसे युती होणार अशा चर्चांना उधाण आलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

आपल्या विदर्भ दौऱ्याबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले, की गेल्या दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर मी पहिल्यांदा विदर्भ दौऱ्यासाठी आलो आहे. दोन वर्षात सगळेच शांत होते. नागपूरमधील काही झाडाझडती बाकी होती, ती काल झाली. नागपूर जिल्ह्यातील शहरातील सर्व पदे बरखास्त करत आहे, लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर केली जाईल.

MNS Raj Thackeray News
Cheetah In India: 'त्या' ८ चित्त्यांचं नामकरणं झालं; PM मोदींनी ठेवलं खास नाव!

युतीच्या काळात भाजपने कधीच मुख्यमंत्रीपद मागितलं नाही

दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. भाजपने युतीच्या काळात कधीच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नाही. युतीमध्ये ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्रीपद देणं ठरलेले होते.

'मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होतं, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी, अमित शाह हे प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं बोलत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? हा मतदारांचा अपमान आहे. या सगळ्या गोष्टी मतदारांसमोर येणं आवश्यक आहे', असंही राज ठाकरे म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com