Aadesh Bandekar News: आदेश बांदेकरांवर गुन्हा दाखल करा...; मनसेची मागणी, काय आहे प्रकरण?

MNS News: आदेश बांदेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Aadesh Bandekar
Aadesh Bandekar Saam TV

Aadesh Bandekar : आदेश बांदेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. मंदिराला दान म्हणून आलेलं सोन नकली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी बांदेकर यांच्यावर हे आरोप केले आहेत. (Latest Aadesh Bandekar News)

नेमकं काय घडलंय?

मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, " दि १९/०१/२०२३ रोजी सिद्धिविनायक मंदीर येथे एक ॲब्युलन्स आली या गाडीत एक व्यक्ती होती या व्यक्तीला घेण्यासाठी बांदेकर स्वतः आले. त्या व्यक्तीने एक सोन्याचा हार,चैन आणि लॉकेट काउंटरला दिले. सदर व्यक्तीने याची कोणतीही रिसिट घेतली नाही. नंतर हे सर्व नकली निघाले. बांदेकर हा माणुस कोण होता? त्याला घ्यायला तुम्ही खाली का आलात याचा खुलासा करावा तुम्ही काय नकली पणा चालवलाय. "

आदेश बांदेकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा

" कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा तसेच या दिवशीचे सीसीटीव्ही समोर आणावे. आम्ही तुम्हाला दोन दिवस देत आहोत तुम्ही या गोष्टीचा खुलासा करा. अन्यथा आम्ही स्वतः यात लक्ष घालू आणि आमच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळू. ", असा इशारा मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी कार्यकारी अधिकारी नंदा राऊत आणि आदेश बांदेकर यांना दिला आहे.

Aadesh Bandekar
Maharashtra Politics News: नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?; सांगितला तो किस्सा

दरम्यान सेना आणि वंचितच्या युतीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. " साधारण ६ वर्षांपूर्वी जेव्हा सेना भाजप युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरेंनी जाहीर केले की आता शिवसेना कोणापुढे कटोरा घेऊन जाणार नाही आणि शिवसेना एकहाती भगवा फडकावेल. बाळासाहेबांनी एकदा भूमिका मांडली की, ते त्यावर ठाम राहायचे. उद्धव ठाकरे नेमकं उलट करतात म्हणून ते आम्हाला आवडतात." , असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com