MNS : विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र न दिल्याने 'मनसे' चा महाविद्यालयात राडा

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडला.
Wardha
Wardhasaam tv

- चेतन व्यास

Wardha News : वर्धा शहरातील एका खासगी नर्सिंगच्या महाविद्यालयात आज (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह, विद्यार्थी तसेच काही पालकांनी राडा घातला. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र न मिळाल्याने हा प्रकार घडला. यावेळी महाविद्यालयाच्या कार्यालयात पालकांसह विद्यार्थी तसेच मनसे (mns) कार्यकर्ते आक्रमक झाले हाेते. (Breaking Marathi News)

Wardha
Ajit Pawar News : अजित पवार विश्वासघातकी ! 'त्यांच्यावर काका शरद पवारांचाही विश्वास राहिला नाही'

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार आज नर्सिंगच्या प्रथम सत्राचा पेपर हाेता. मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्रच मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले हाेते. प्रवेशपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्याचे (student) शैक्षणिक सत्राचे नुकसान हाेणार या भीतीने काहींनी त्यांच्या पालकांना बाेलावून घेतले.

Wardha
Jalna : उद्याेजकाचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी; अर्जुन खाेतकरांचा जावई प्रसिद्ध क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल

त्यानंतर पालकांनी महाविद्यालय व्यवस्थापनास जाब विचारला. परंतु कॉलेजच्या (college) स्टाफला व्यवस्थित माहिती देता आली नाही. त्यातच मनसे कार्यकर्ते महाविद्यालयात पाेहचले. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र का दिले गेले नाही असे म्हणत महाविद्यालयात राडा घातला. यावेळी महाविद्यालयातील खूर्चींच्या नुकसान झाले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com