राज्य सरकारचा पोलीस प्रशासनावर दबाव; मनसे कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

राज्य सरकारचा पोलीस प्रशासनावर दबाव; मनसे कार्यकर्त्यांचा हल्लाबोल
Raj Thackeray BookedSAAM TV

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादच्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना नोटीसाही बजावल्या आहेत. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगत आहेत. मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) जहरी टीका केलीय. हे मुल्ला अली अब्बासचे सरकार आहे. या सरकारचा पोलीस प्रशासनावर दबाव आहे. असं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Raj Thackeray Booked
कायदा तोडणारा कोणीही असो, राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करणार : नाना पटोले

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजय शिंदे म्हणाले, मुल्ला अली अब्बासचे सरकार आहे. या सरकारचा पोलीस प्रशासनावर दबाव आहे. पुण्यात उद्या मशिदींसमोर हनुमान चालीसाचे भोंगे वाजणार. पुण्यातील खालकर चौकात मनसे कार्यकर्ते जमणार आहेत. पुण्यातही मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा धाडल्या आहेत. पण तरीदेखील उद्या महाआरती होणारच आहे. ज्या मशिदीत भोंगे वाजतील त्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्यावर मनसे कार्यकर्ते ठाम आहे.

राज ठाकरे यांच्यासह सभेचे संयोजक राजू जवळेकर आणि मनसेचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.