"माहाआरती होणारच, मनसैनिक घाबरणार नाही"

"माहाआरती होणारच, मनसैनिक घाबरणार नाही"
MNSSaam TV

पुणे : औरंगाबादमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) जाहीर सभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घातलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केलीय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा (Legal Notice) धाडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसैनिकांना नोटीसा जरी दिल्या तरी महाआरती होणारच. राज ठाकरे यांचा आदेश पाळला जाईल. अशाप्रकारे मनसेच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संभूस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

MNS
Raj Thackeray Latest Update: राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

हेमंत संभूस माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावणं सुरू आहे. मनसैनिकांना जरी नोटिसा दिल्या तरी महाआरती होणारच. राज ठाकरे यांचा आदेश आहे तो पाळला जाईल. भोंग्यांबाबत पोलीस नीट माहिती सांगत नाहीत. माहाआरती होणारच, मनसैनिक घाबरणार नाही.

राज ठाकरे यांच्यासह सभेचे संयोजक राजू जवळेकर आणि मनसेचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.