परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक; स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा इशारा

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv

भूषण शिंदे

MNS News : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. भूमीपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी मिळवून देण्याचा मुद्दा मनसेने पुन्हा उचलून धरला आहे. महाराष्ट्रातील चालत असणाऱ्या बार्बीक्यु नेशनमध्ये बहुतांश परप्रांतीय कामगार काम करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. नोकरीत स्थानिकांना डावलल्याच्या मुद्द्यावरून मनसेने बार्बीक्यु नेशन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray
Raj Thackeray: अंगावर आले तर शिंगावर घ्या; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला

महाराष्ट्रातील चालत असणाऱ्या बार्बीक्यु नेशनमध्ये ९० टक्के परप्रांतीय कामगार काम करत असल्याचा आरोप मनसेचा (MNS) आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात परप्रांतीयांना काढून स्थानिकांना कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे. लघू उद्योगात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या कायद्याची आठवण मनसेने करून दिली आहे.

Raj Thackeray
Thackeray-Ambedkar: वंचित-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; मग महाविकास आघाडीचं काय?

महाराष्ट्रात जवळपास बार्बी क्यु नेशन सेंटरच्या २८ शाखा आहेत. या प्रत्येक शाखेमध्ये 30 ते 40 कामगार काम करतात. या कामगारांमध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथून आलेले कामगार काम करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

बार्बीक्यु नेशनमध्ये महाराष्ट्रातील मराठी लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि त्यांना आपल्या बार्बीक्यु नेशनमध्ये कामाला ठेवून घेण्यात यावे. तरी आम्हाला योग्य ते उत्तर १५ दिवसात दिले नाही तर तुमच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, अशा आशयाचे पत्र मनसे पदाधिकारी, शांताराम राणे , चिटणीस , महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेना यांनी बार्बीक्यु नेशन सेंटरला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com