मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव

सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव
Sandeep Deshpande Saam Tv

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) आणि संतोष धुरी यांनी पळ काढला होता. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर देशपांडे आणि धुरी फरार झाले. त्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) देशपांडे आणि धुरीचा शोध घेत आहेत. परंतु, संदीप देशपांडे यांनी आता मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. देशपांडे यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

व्हिडिओत काय म्हणाले होते संदीप देशपांडे ?

आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो. मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलतो. संजय राऊतांच्या विरोधात बोलतो. आम्ही जेलला घाबरत नाही. आम्ही पोलीस कस्टडीला घाबरत नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. ज्या ज्या वेळेला आंदोलनं केली त्या त्या वेळेला हजर झालोय. पण अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणार असला तर मी सहन करणार नाही. माझी पोलिसांना विनंती आहे. माझी बायको घरी असते आणि ६ वर्षांचा मुलगा असतो. पुरुष पोलीस म्हणून तुम्ही रात्री बारा वाजता घुसण्याचा प्रयत्न करता, ते कृपया करु नका. पोलिसांत पोलिसांसारखे वागा. मी घरी नाहीये. मी कायदेशीर सल्ला घेतोय. कायदेशीर सल्ल्यानुसार मी वागेल आणि किती दिवस मला जेलमध्ये ठेवणार ? मी त्या गोष्टीला घाबरत नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तयार आहे. खोटे गुन्हे मी सहन करणार नाही. माझा न्यायालयावर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.