
डोंबिवली : स्वतःचा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवला, तेव्हा आम्ही बोलायचं का यांनी फोटोग्राफरचा गळा घोटला, असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना टोला लगावला आहे. ठाकुर्लीतील कचोरे गाव आणि डोंबिवलीतील आजदे गाव याठिकाणी आमदार निधीतील विकास कामांचे मनसे आमदार राजू पाटील यांच्याहस्ते आज भूमीपूजन झाले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि उत्तर प्रदेश मधील भाजप (bjp) खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले मनसे आमदार राजू पाटील ?
स्वतःचा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या पायांशी नेऊन ठेवलाय तेव्हा आम्ही असं बोलायचं का यांनी एका फोटोग्राफरचा गळा घोटला. तसेच पवार साहेबांच्या माध्यमातून एका पक्षाचा गळा घोटला. संजय राऊतांना काही काम धंदे नाही आहेत. त्यांनी एकांतात भाष्य किंवा बडबड करण्याची सवय लावून घ्यावी, असे राज ठाकरेच मागे बोलले आहेत. त्यामुळे ते यांची प्रॅक्टिस करत असावे.
काय म्हणाले होते शिवसेना खासदार संजय राऊत ?
बाळासाहेब ठाकरे हे आधी प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेबांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले, त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र कला पुढे जाईल असा आम्हाला वाटलं होतं. मात्र, दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाने त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटला आहे. असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंसह भाजपवर निशाणा साधला. जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधत ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.ते पुढे म्हणाले, कोणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेलाफरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुंना देखील त्रास होत असल्याने लाखो हिंदुंनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे राज यांनी सुरू केलंलं मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण हिंदुंच्याच गळ्याशी आलं असल्याचंही राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना मनसे आमदारांचं उत्तर....
दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना उत्तर दिले आहे.मनसे आमदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हास्यास्पद मागणी आहे, त्यांची म्हणणं आहे त्यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीय महासंघा पुढे केलेली भाषण आयकाव. त्यांना एखाद्याने पुढे केलेले असावं अथवा त्याच वयक्तित मत असेल आणि राज साहेबांना माफी मागितल्यावर येऊन देऊ अश्या वल्गना कोणी करू नये. उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश दिला जाईल असे ते म्हणाले होते.'
Edited By- Naresh shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.