इगो बाजूला ठेवून राज ठाकरे यांना विचारलं असतं, तर...; राजू पाटील यांचा शिवसेनेला टोला

राज्यसभा निवडणुकीसाठी उद्या १० जूनला मदतान होणार असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आला आहे.
MNS Raju Patil
MNS Raju PatilSaam Tv

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (RajyaSabha Election) उद्या १० जूनला मदतान होणार असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाच्या आमदाराच्या मतदानाला अनन्यसाधारण महत्व असल्याने नेतेमंडळींच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील (Raju patil) यांच मत कोणाल मिळणार ? मनसे (MNS) कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, अशा चर्चां राजकीय मैदानात रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

MNS Raju Patil
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा

यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, भाजपचे आमदार आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मित्र आहेत. मनसेचा पाठिंबा भाजपला मिळण्यासाठी शेलार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, काही लोक एमआयएम आणि अबू आझमींच्या मागे व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा अहंकार सोडता येत नाहीय. त्यांनी जर इगो बाजूला ठेवून राज ठाकरे यांना विचारलं असतं, तर त्यांनीही विचार केला असता, असा टोला आमदार पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे.

MNS Raju Patil
रिषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार; गर्लफ्रेंड झाली खूश, इन्स्टाग्रामवर शेअर केला जबरदस्त मेसेज

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी सध्या राज्यातील बहुतांश आमदार हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बंदिस्त आहेत.तर मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील एकमेव आमदार राजू पाटील हे मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदार संघात फिरत आहेत.आज मनसे आमदार यांनी दिवा शहरातील समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तसेच दिवा शहरात येऊन नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com