
Raj Thackeray Vidarbh Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी (१८ सप्टेंबर) त्यांचा विदर्भ दौऱ्याचा पहिला दिवस होता. यावेळी नागपुरात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. दरम्यान, विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट केलीये. या पोस्टमधून त्यांनी आपल्या विदर्भ दौऱ्याची माहिती दिली आहे. (Raj Thackeray Todays News)
काय म्हणाले राज ठाकरे?
'आजपासून नागपूरहून माझ्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली. कोरोनानंतरचा हा माझा पहिलाच विदर्भ दौरा. दीर्घकाळाने मी विदर्भातील माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटत होतो. ह्या भेटीची मला जितकी उत्सुकता होती, तितकीच उत्सुकता महाराष्ट्र सैनिकांमध्ये देखील होती; ज्याचं प्रतिबिंब आजच्या स्वागतात दिसलं'. असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'आज रविभवन येथे नागपूर शहरातील ६ विधानसभा, आणि नागपूर ग्रामीणमधील ६ विधानसभा अशा १२ विधानसभांमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. ह्यात पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना, अपेक्षा, त्यांच्या मनातील योजना समजवून घेतल्या. ह्यापुढच्या काळात श्री. अनिल शिदोरे, श्री. प्रकाश महाजन, श्री. राजू उंबरकर, श्री. अविनाश जाधव आणि आणि श्री. संदीप देशपांडे हे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे आणि शिबिरं घेतील'. असंही राज ठाकरे म्हणालेत. (Raj Thackeray News Today)
आज काही दृष्टिहीन तरुण भेटायला आले होते; दृष्टिहिनांच्या समस्यांचं पुरेसं आकलन आज देखील सरकारी पातळीवर झालेलं नाही असं त्यांच्याशी झालेल्या चर्चेत लक्षात आलं. त्यांनी सांगितलेल्या काही तक्रारींचा पाठपुरावा लवकरच पक्षाच्या वतीने सरकार पातळीवर केला जाईल. असं आश्वासन सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिलं आहे.
'गडकरींचे आणि माझे विचार जुळतात'
दरम्यान, विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक देखील केलं, गडकरी आणि माझे विचार जुळतात असं राज ठाकरे म्हणाले. या दोन्ही बड्या नेत्यांनी नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. हा कार्यक्रम पाहून राज ठाकरे भारावून गेले होते.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.