MNS Rally: भरपावसात मनसेची स्वप्नपूर्ती रॅली; पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड

MNS Rally At Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेने शहरात स्वप्नपूर्ती रॅली काढली.
MNS Rally At Chhatrapati Sambhaji Nagar
MNS Rally At Chhatrapati Sambhaji NagarSaam TV

Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेने शहरात स्वप्नपूर्ती रॅली काढली. या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, मनसेनं भरपावसातही रॅली काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

परवानगी नसतानाही मनसेने काढलेली रॅली पोलिसांनी रोखली. त्यामुळं आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली. (Latest Marathi News)

MNS Rally At Chhatrapati Sambhaji Nagar
MNS News : मोठी बातमी! मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा तापणार; मनसे आक्रमक, गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?

छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी तीन दशकांहून अधिक काळापासून होत होती. अखेर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर नामकरणाची स्वप्नपूर्ती झाल्यामुळं मनसेने रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली.

परवानगी नाकारल्यानंतर रॅली काढणारच अशी ठाम भूमिका मनसेने घेतली होती. त्यानुसार मनसे कार्यकर्ते संस्थान गणपतीची आरती करून भरपावसात विभागीय आयुक्तालय कार्यालयाकडे निघाले होते. त्याचवेळी पोलिसांनी रॅली अडवली. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांनी धरपकड सुरू केली.

MNS Rally At Chhatrapati Sambhaji Nagar
Jalna Accident News : जालना- अंबड महामार्गावर यात्रा स्पेशल बसला अपघात, 30 प्रवासी जखमी

मनसे कार्यकर्त्यांच्या रॅलीला अडवल्यामुळे ते आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीला तुम्ही परवानगी देता, तर आम्ही शांततेने रॅली काढतो, तर तिला का अडवता, असा सवाल मनसेकडून उपस्थित केला. पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com