
Sandeep Deshpande Press Conference : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते त्यांच्यावर त्यांच्यावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यानंतर आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले संदीप देशपांडे?
मी महाविकास आघाडी सरकराच्या काळातील घोटाळ्यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार होतो, त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाला असा आरोप संदीप देशपांडे यांनी यावेळी केला आहे. काल मी नेहमीप्रमाणे वाॅक करताना माझ्यावर हल्ला झाला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पोलीस तपासात लवकरच माझ्यावर नेमका हल्ला कोणी केला हे स्पष्ट होईल. असं संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले.
शुक्रवारी सकाळी मी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालो होतो. सकाळी शिवाजी पार्कच्या गेट नंबर पाच पाचजवळ असताना माझ्यावर एका व्यक्तीने स्टंपने हल्ला केला. मी मागेवळून बघताच तो माझ्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टंप पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या एका व्यक्तीने स्पंटने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी उपस्थित लोक माझ्या दिशेने धावून आल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला, अशी संदिप देशपांडे यांनी दिली. (Maharashtra Political News)
देशपांडे पुढे म्हणाले की, मी यांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे. तक्रारीही दिल्या आहेत. कालच्या हल्लेखोरांनी माझ्या हातापायावर मारण्याऐवजी थोबाडावर मारायला पाहिजे होतं, कारण मी घोटाळ्यांवर बोलणार आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढणारच, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करणारे आरोपी हे भाडुंप पश्चिम येथील राहणारे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हा हल्ला राज्यकीय वादातून करण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एकाच नाव अशोक खारत तर दुसऱ्याच नाव सोलंकी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींकडून पोलीस कसून चौकशी करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.