Political News
Political NewsSaam Tv

‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

मनसेने एक व्यंगचित्र शेअर करत मुलाखतीवर टीका केली आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली.मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राऊतांनी उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. या मुलाखतीवर आता मनसेच्या (MNS) वतीने टीका करण्यात आली आहे. “साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर करत मुलाखतीवर टीका केली आहे. या व्यंगचित्रात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसत आहे. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे.

Political News
बाळासाहेबांनंतर त्यांना शिवसेना संपवायची होती; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

विशेष म्हणजे या व्यंगचित्रात संजय राऊतांच्या हातामध्ये घड्याळ दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या व्यंगचित्रात राऊत ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात “हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं”, असं संजय राऊत म्हणतात. “त्यावर बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं”, असं उद्धव ठाकरे म्हणतात. असा संवाद दाखवल आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com