Nana Patole News : मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा मोदी सरकारचा प्लान, नाना पटोले यांचा मोठा दावा

Politcal News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसलाही विरोध करण्याची हिम्मत दाखवली नाही.
Nana Patole on PM Narendra Modi
Nana Patole on PM Narendra Modisaam tv

शुभम देशमुख

Mumbai News :

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याकरिता प्लान सुरू आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष संसद अधिवेशनात देशाचे तुकडे होणार, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने स्पष्ट केलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर नाना पटोले यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Nana Patole on PM Narendra Modi
Dharashiv Maratha Andolan : तानाजी सावंत मराठा आंदोलकांच्या भेटीला, राजीनाम्याच्या मागणीने आंदोलनस्थळी गोंधळ, नेमकं काय घडलं?

केंद्राने कोरोना संकटावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, नोटबंदीच्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, मणिपूरच्या मुद्यावरही विशेष अधिवेशन बोलावले नाही. पण आपल्या लहरी व मनमानीपणाने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. (Political News)

मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची, देशाची शान आहे आणि हेच भाजपाला खुपत असल्याने मुंबईतील सर्व शक्तीस्थाने गुजरातला घेऊन जायचा मोदी सरकारचा प्लान आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

पटोले यांनी पुढे म्हणाले की, मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम मागील ९ वर्षात अनेकदा झाले आहेत. जागतिक वित्तिय केंद्र गुजरातला पळवले, मुंबईतील मोठा हिरे व्यापार गुजरातला पळवला, मुंबईतील एअर इंडियाचे मुख्यालय मुंबई बाहेर हलवले. आता मुंबईतील ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (BSE ), आणि ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (NSE ) सुद्धा गुजरातला घेऊन जायचा डाव आहे. मुंबईला तोडण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र आहे, असा दावा पटोले यांनी केला.

Nana Patole on PM Narendra Modi
Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील २२ दिवस हार्बर मार्गावर ब्लॉक; रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार अडथळा ठरत होते, म्हणूनच केंद्र सरकार व राज्यपाल यांच्या मदतीने मविआचे सरकार पाडले. आता शिंदेंच्या नेतृत्वखालील सरकार आल्यापासून मुंबई व महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातले पळवून नेले.

याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसलाही विरोध करण्याची हिम्मत दाखवली नाही. शिंदे-फडणवीस व पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबईतील महत्वाची कार्यालये व प्रकल्प बाहेर घेऊन जात असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांना जाब विचारून दाखवावा, असेही नाना पटोले म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com