Mohan Bhagwat Statement: शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू राष्ट्र! सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

Mohan Bhagwat About Hindurastra: छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatsaam tv

Mohan Bhagwat News: छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांनी दिल्लीला खडावून सांगितलं की हिंदू-मुस्लीम दोघांना देवांने निर्माण केले आहे.

राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते की दोघांना समान पाहावे आणि अन्याय करून नये. तुम्ही असं करत असला तर मला माझी तलवार घेऊन उत्तरेत यावं लागेल. या देशाप्रती नातं असणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी सुरक्षित केले. त्याच हिंदवी स्वराज्याला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat
Raj Thackeray On 350th Shivrajyabhishek Sohala: '...तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल', शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरे यांचं ट्वीट

एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते, यावेळी बोलताने ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाले. देशाच्या प्रति स्वाभिमान जागाला. कोव्हिडमध्ये सर्वात चांगले काम भारताने केले. जग आज ज्या देशाला आश्चर्याने बघत आहे तो भारत आहे. नवीन संसद भवनचे उदघाटन झाले. देशाच्या जागृतीसाठी ज्या गोष्टीची गरज होती ते होत आहे. भारत प्रगती करत आहे, लोकं बघत आहेत. मात्र चिंतीत करणारी काही गोष्टी पण आहे, काही कलह देखील आहे, असे ते म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले, भाषा, संप्रदाय याबाबत वाद आहेत, त्याविरोधात उभे राहिले पाहिजे. मात्र आपण आपसात भांडत आहोत. काही राजकीय पक्ष याला हवा देण्याचे काम करत आहे, त्यांनी करावे. मात्र आपल्या भांडणं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देशाच्या अखंडतेसाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. मात्र ते काही लोकं ते करत नाही, असे मोहन भागवत म्हणाले. (Latest Political News)

Mohan Bhagwat
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं आव्हान! ठाण्यात राष्ट्रवादी ठाकरे गटासाठी जागा सोडणार?

पुढे बोलताना ते म्हणाले की, काही संप्रदाय बाहेरून आले, त्याच्याशी आपले वाद झाले, ते निघून गेले. मात्र जे आता आपल्यासोबत आहेत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. देशात नाही तर देशाच्या बाहेर भारताला निचा दाखविणारे लोक आहेत असा टोला देखील त्यांनी राहुल गांधींना लगावला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com