निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही; माजी आमदाराचा राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना इशारा

राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
Rajan Patil NCP
Rajan Patil NCP Saam TV

सोलापूर : आम्ही राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आजपर्यंत ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेनुसारच राजकारण करत आलो आहोत. आम्ही निष्ठावंत असलो, तरी स्वाभिमान गहाण ठेवणारी माणसं नाहीत. अशा शब्दात मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. (NCP Rajan Patil Latest News)

Rajan Patil NCP
संजय राऊतांकडील नोटांच्या पाकीटावर तुमचं नाव कुठून आलं?; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत आमदार बबनराव शिंदे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर तर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनगरमध्ये झालेल्या मेळाव्यात राजन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Rajan Patil NCP
'लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हाती देश देऊन..'; सुबोध भावे काय म्हणाले? वाचा...

लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अनगर येथे आयोजित मोहोळ तालुक्यातील १०५ विविध कार्यकारी संस्थांचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांच्या सत्कार करण्यात आला. त्याकार्यक्रमात माजी आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही आजपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारानेच राजकारण केलेले आहे. आम्ही निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणो नाहीत, असे त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना ठणकावून सांगितले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com