Wardha : कुख्यात पांडे गॅंगवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई : पोलिस अधीक्षक नुरुल हसन

या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी मंजूरी दिली.
Wardha, mokka act, police, sp noorul hasan
Wardha, mokka act, police, sp noorul hasansaam tv

- चेतन व्यास

Wardha : वर्धा (wardha) शहरात मागील काही वर्षांपासून ‘गॅंगवॉर’ उफाळत आहे. काही गुन्हेगारी टोळ्या आमने-सामने येऊन सशस्त्र हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. स्टेशनफैल परिसरात दोन गटात झालेल्या फायरिंग प्रकरणातील कुख्यात असलेल्या पांडे गटातील राकेश पांडेसह (Rakesh Pande) सहा गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी मोक्का (mokka act) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Wardha, mokka act, police, sp noorul hasan
Avkali Paus : अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्या देखत निघून गेला…

राकेश मुन्ना पांडे, गणेश श्याम पेंदोर, विकास सूरज पांडे, शेख समीर अब्दुल रहीम उर्फ समीर दालगरम, राहुल रमेश मडावी, मिथुन भागवत उईके, प्रज्वल दिनेश पाझारे सर्व रा. इतवारा यांना मोक्का कायद्यांतर्गत अटक करुन मोक्का न्यायालयात हजर केले असता २३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पोलिस विभागाने संघटीत गुन्हेगारी मोक्का कायद्यान्वये २०१८ मध्ये एका गुन्हेगारी टोळीवर कारवाई केली होती. आज तब्बल पाच वर्षानंतर पहिल्यांदाच कुख्यात पांडे गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राकेश पांडे याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी विविध गंभीर असे ३९ गुन्हे शहर पोलिसात दाखल आहेत. (Maharashtra News)

Wardha, mokka act, police, sp noorul hasan
Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर LCB ची ‘फिल्मिस्टाईल’ कारवाई; वर्धेत जाणारा ९ लाखांचा मद्यसाठा जप्त

वर्धा शहरातील स्टेशनफैल परिसरात राकेश पांडे गट आणि आदिल शेख गटातील गुन्हेगारांमध्ये चांगलाच राडा झाला होता. याप्रकरणात फायरिंग देखील झाली होती. पोलिसांनी पांडे गटातील सर्वच आरोपींना ४८ तासांत अटक केली.

वारंवार संघटीत गुन्हेगारी फोफावत असल्याने पोलिस अधीक्षक नुरुल हसन (sp noorul hasan) यांनी गांभीर्याने लक्ष देत राकेश पांडे गटातील सहा गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ चे कलम समाविष्ट करुन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी मंजूरी दिली.

Wardha, mokka act, police, sp noorul hasan
Bribe : दारू-मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल

सर्व कुख्यात आरोपींना वर्ध्यात २०२१ मध्ये स्थापना झालेल्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करुन २३ मार्च पर्यंत पोलिस कोठडी प्राप्त केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केलीय.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com