चवताळलेला माकड अखेर जेरबंद; पाच बालकांना घेतला होता चावा

बारा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
चवताळलेला माकड अखेर जेरबंद; पाच बालकांना घेतला होता चावा
चवताळलेला माकड अखेर जेरबंद; पाच बालकांना घेतला होता चावाजयेश गावंडे

अकोला - अकोट येथील यात्रा चौक ते लेंडीपुरा दूरदर्शन केंद्र, गवळीपुरा यापरिसरात एका चवताळलेल्या माकडाने ५-६ बालकांवर हल्ला करीत चावा घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती, अखेर आज वनविभागाने या माकडाला अखेर जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून अकोट मध्ये माकडाने धुमाकूळ घातला होता. या चवताळलेल्या माकडाने अकोट येथील पाच ते सहा बालकांना जखमी केले होते. त्यामुळे या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत होती.

हे देखील पहा -

या चवताळलेल्या माकडाने परिसरात दहशत निर्माण केली होती. अखेर याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर बारा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

चवताळलेला माकड अखेर जेरबंद; पाच बालकांना घेतला होता चावा
विमा कंपनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

बुलढाण्याचे पथक श्वनरक्षक विनोद मुळे, वनरक्षक समाधान मानटे, संदीप मडावी, पवन वाघ वनमजुर यांच्या सहकार्याने माकडाला वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाने व अकोट पशुधन विकास अधिकारी खोडवे यांचे मार्गदर्शनाने अकोट वन्यजीव विभागांतर्गत नरनाळा परिक्षेत्रात सुखरूप सोडण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com