
अक्षय बडवे, पुणे
monsoon 2023 arrival date : असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंताजनक वार्ता आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. एरवी केरळमध्ये १ जूनला येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी येण्याची शक्यता आहे.
४ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर पुढील २ दिवसांत म्हणजेच ६ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होईल, असा पूर्व अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. (Breaking Marathi News)
मान्सूनच्या आगमनाची चाहुल लागताच सर्वसामान्यांसह शेतकरी राजा सुखावून जातो. आभाळाकडे डोळे लावून बसतो. मात्र, यंदा हाच मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असून, ६ जून रोजी महाराष्ट्रात हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरवेळी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा हाच मान्सून दोन ते तीन दिवस उशिराने दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून, मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे अनुपम कश्यपी यांनी दिली.
केरळमध्ये २०१८ साली मान्सूनचं आगमन २९ मे रोजी, २०१९ मध्ये ८ जून रोजी, तर २०२० मध्ये १ जूनला वेळेवर, २०२१ मध्ये ३ जून आणि २०२२ मध्ये २९ मे रोजी झालं होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.