वेळेआधीच राज्यात पावसाचं आगमन, जालन्यात वादळी-वाऱ्यासह सरी बरसल्या

वादळी-वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत असल्याने परिसरात गारवा पसरला आहे.
वेळेआधीच राज्यात पावसाचं आगमन, जालन्यात वादळी-वाऱ्यासह सरी बरसल्या
Maharashtra Rain Saam Tv

जालना : यंदा नैऋत्य मोसमी वारे (Monsoon) वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असतानाच जालन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. वादळी-वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत असल्याने परिसरात गारवा पसरला आहे. उन्हामुळे लाही लाही झालेल्या नागरिकांना पावसाचं आगमन (Rain in jalna) झाल्याने उष्माघातापासून (Summer Hit) दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज सकाळपासून जालन्यात कडक उन्हाची झळ पसरली होती. मात्र, दुपारनंतर वातावरणात अचानक बदल (climate change) झाल्याने परतूर तालुक्यातील काही गावांसह केंधळी, वाटूर, एदलापूर येथे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.लहान मुलंही या पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत.

Maharashtra Rain
Mumbai Breaking News: मुंबईत NCBची मोठी कारवाई; दीड कोटींचे ड्रग्ज पकडले, अमेरिकेतून आले होते पार्सल

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्यासाठी हवामान पोषक झाले आहे. त्यामुळे रविवार पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज जाहीर केला होता. त्याआधीच जालन्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

जालन्यात आज मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळं काही नागरिकांची तारांबळ उडाली तर ऊन्हामुळं लाही लाही झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.हवेतही गारवा निर्माण झाल्याने थंडीची चाहुल जाणवू लागली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.