आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

मान्सून वेळेअगोदरच येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
Monsoon AlertSaam Tv

पुणे : यंदा मान्सून वेळेअगोदरच येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. प्रत्येकवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल असतो. मात्र, यावर्षी पाऊस (rain) १३ ते १९ मे दरम्यान म्हणजे वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने (weather department) वर्तविले आहे. यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये (Kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणामध्ये २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हे देखील पहा-

भारतीय हवामान खात्याने पुढील ४ आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान खात्याकडून १५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच दाखल होणार आहे.

पुणे (Pune) हवामान खात्याचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट (Tweet) करत पावसाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर (Arabian Sea) पाऊस शक्यता आहे, आणि त्यानंतर पुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होणार आहे.

Monsoon Alert
पेन्शनबाबत चांगली बातमी! NPS अंतर्गत मिळणार 'गारंटीड रिटर्न', जाणून घ्या

भारतीय हवामानशास्त्र खात्याच्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे, बंगालच्या उपसागरावर 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि जवळील राज्यात दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वाऱ्याबरोबरच पाऊस पडणार आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.