Monsoon Session : फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

२०१६-१७मध्ये मी खासदार असताना माझा फोन टॅप करण्यात आला. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.
Monsoon Session : फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश
Monsoon Session : फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश Saam tv

पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसऱ्या दिवशी सभागृहात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंगसंदर्भात (Phone tapping) गंभीर आरोप केले. ''२०१६-१७मध्ये मी खासदार असताना माझा फोन टॅप करण्यात आला. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. पण माझा फोन टॅप केला आणि माझं नाव अमजद खान ठेवल गेलं,'' असं नाना पटोले यांनी सांगितलं. तसेच, माझ्या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे पीए, तसेच खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांचा देखील फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सभागृहाला त्याची माहिती देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी यावेळी केली. (Monsoon Session: High Level Inquiry Order in Phone Tapping Case)

फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना नाना पटोले यांनी माहिती दिली. ''मी खासदार असताना माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. माझ्याशिवाय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह खासदार संजय काकडे यांचाही फोन टॅप करण्यात आल्याची माहिती मला मिळाली. खरतर कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. धर्मातही हेच म्हटलं आहे. पण आता सुसंस्कृत लोकंच जर असं राजकारण करत असतील तर त्यांच त्यांना माहित. धक्कादायक म्हणजे माझ्यासाठी मुसलमानांचंच नाव ठेवण्यात आलं. मुसलमानांचीच नावं टाकून हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून धर्माच्या नावाने राजकारण करण्याचा आणि राज्य पेटवायचं हा उद्देश होता का?” असा सवालही यावेळी नाना पटोले यांनी केला.

Monsoon Session : फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश
Monsoon Session : सरकारची अभिरुप विधानसभेवर कारवाई, थेट प्रक्षेपण बंद

हे फोन टॅपिंग करण्यामागे कोणाचा हात आहे? पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून २०१७-१८ च्या काळात आमचे फोन टॅप करण्यात आले, हे कुणाच्या आदेशाने केले? असे प्रश्न नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केले. त्याचबरोबर ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय न करता अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर असे अनेक आरोप करण्यात आले आहे. हे सर्व पाहता किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती समोर आली पाहिजे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ?याला शासनाची मान्यता घ्यावी लागते का, असे अनेक प्रश्न उपस्थित करत या सर्व प्रकरणाची माही समोर आली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

Edited By- Anuradha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com