पाच महिन्यात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होणार?

५ महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे
पाच महिन्यात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होणार?
पाच महिन्यात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होणार?Saam Tv

नागपूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. येत्या ५ महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन Covaxin लस उपलब्ध कोण्याची शक्यता आहे. सध्या नागपूरात Nagpur लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची चाचणी Test सुरु असून, नागपुरमध्ये १२ ते १८ वर्षांच्या ४० मुलांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आले आहे.

दुसरा डोस देण्यापूर्वी मुलांचे सॅम्पल्स गोळा करून, ॲंटिबॅाडीजचे antibodies सकारात्मक रिपोर्ट येतील, अशी डॅाक्टरांना अपेक्षा आहे. नागपूरमधील आतापर्यंत २ ते १८ वयोगटामधील ९० मुलांवर कोरोना लस vaccine देण्यात आली आहे. यामध्ये सर्वांची प्रकृती ठणठणीत आहेत.

हे देखील पहा-

पहिल्या टप्प्याच्या अभ्यासानंतर लहान मुलांना लसीच्या गरजांना परवानगी मिळण्याची शक्यता, आणि लहान मुलांवर लसीची चाचणी करणारे डॉ. वसंत खळतकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे ५ महिन्यात लहान मुलांची लस उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. नागपूर लेव्हल थ्री मध्ये असताना देखील नागपूरात लेव्हल थ्री चे नियम लावण्यात आले आहेत.

पाच महिन्यात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होणार?
मुलांच्या लसीकरणाला सुरुवात: 2 ते 6 वर्षांच्या 5 मुलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस

शहरात सर्व प्रकारच्या दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे शहरामधील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने नियम ठरवून दिल्यावर, त्याचे पालन प्रशासन Administration करत नाही, असा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com