50 कोटींपेक्षा जास्त हप्ता पोलीस अन् महसूल प्रशासनाला मिळतो- भाजप आमदार

वाळूघाटामुळं गेवराईला मुद्दाम अधिकारी बदली करून येतात - आमदार पवार
BJP MLA
BJP MLAविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: गेवराई तालुक्यात वाळू घाट असल्यामुळं अधिकारी हे मुद्दाम बदली करून येतात. आजघडीला वर्षाकाठी जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त हप्ता, एकट्या वाळूमधून हा पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचार्यांना मिळत आहे, असा गंभीर अन् खळबळजनक आरोप भाजप आमदार लक्ष्मण पवार (BJP MLA Lakshman Pawar) यांनी केला आहे. नियमबाह्य वाळू उपश्यावरून आमदार पवार आक्रमक झाले. त्यांनी आज सकाळपासून बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी आमदार पवार म्हणाले की, गेवराई तालुक्यात येणारे पोलीस अधिकारी असतील किंवा महसूल अधिकारी कर्मचारी असतील, हे मुद्दाम त्या परिसरात वाळू घाट आहे. हे पाहून त्या ठिकाणी बदली करून येत आहेत. आमच्याकडे तलाठ्यापासून ते s.d.o. अधिकाऱ्यांपर्यंत कोणालाच वाटत नाही की वाळू उपसा बंद व्हावा. प्रत्येकाला वाटतं आपला खिसा भरला जावा. "माझा स्पष्ट आरोप आहे, की पन्नास कोटी पेक्षा जास्त हप्ते हे महसूल आणि पोलिस प्रशासनाला भेटले जात आहेत". त्यामुळे गृहित धरा तुम्ही, की दर महिन्याला चार साडेचार कोटी रुपये हप्ता भेटत असेल तर किती मोठ्या प्रमाणात वाळूचा धंदा चालू आहे आणि किती मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत आहे. वाळू धंद्याची पोलखोल करत, असा देखील अंदाज यावेळी पवार यांनी व्यक्त केलाय.

BJP MLA
Flood In Assam: आसाममध्ये पुरामुळे नुकसान, 25 ठार, हजारो एकरांवरील पिके नष्ट

ते म्हणाले, की या अगोदर अवैध वाळू उपसा केला जात होता. त्यावेळी मोठाले खड्डे पाडायचे आणि त्या ठिकाणी अनेक अपघात होऊन लहान मुलांसह महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा करून भरधाव वेगातील वाहनांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे आम्हाला वाटायचं, की हे थांबण्यासाठी वाळूचे टेंडर व्हायला पाहिजेत.

हे देखील पाहा-

मात्र, आता वाळूचे अधिकृत टेंडर्स झाले आहेत, मात्र पहिल्यापेक्षा ही परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. अगोदर 40 ते 50 हायवा गाड्या भरायच्या, मात्र आता 24 तासात 200 ते 250 हायवा गाड्या भरल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गोदा पात्रातील वाळू उत्खनन हा गंभीर विषय बनत चालला आहे. असा गंभीर व खळबळजनक आरोप करत आमदार लक्ष्मण पवार हे वाळू उपश्यावरून आक्रमक झाले आहेत. त्यामुळं प्रशासन आता काय कारवाई करणार ? याकडं मात्र सर्वांचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com