मोरणा- गुरेघर धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले

पाटण तालुक्यामधील मोरणा- गुरेघर धरण परिसरात पाऊसाचा जोर वाढला
मोरणा- गुरेघर धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले
मोरणा- गुरेघर धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचललेओंकार कदम

सातारा : पाटण Patan तालुक्यामधील मोरणा- गुरेघर Morna Gureghar धरण परिसरात पाऊसाचा जोर वाढला असून, रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे Rain धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

धरणाच्या Dam दरवाजातून २०४० व्युसेस पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या river पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरणा नदीच्या काठावरील गावांना villages सर्व लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या, मुसळधार पावसामुळे या धरणामध्ये ९४.१५ टक्के पाणी साठा झाला आहे.

मोरणा- गुरेघर धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले
BREAKING | जळगाव: हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले

धरणामध्ये १७९३ क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फूटाने उचलल्याने धरणामधून २०४० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होतं आहे. यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील गावांना जोडले जाणारे छोटे- मोठे पूल आता पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने administration सतर्कतेचा इशारा दिला आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com