धक्कदायक! आई आणि मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

या मायलेकीने शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
Udgir Police Station
Udgir Police Stationदीपक क्षीरसागर

लातुर - उदगीर (Udgir) तालुक्यातील काशीराम तांडा येथील आपल्या शेतीतील लिंबाच्या झाडाला आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 35 वर्षीय संगीता गंगाराम चव्हाण आणि तिची 13 वर्षीय मुलगी अंजली गंगाराम चव्हाण या मायलेकीने शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत रात्री उशिरा वैजनाथ तुकाराम राठोड यांनी पोलीस (Police) ठाण्यात या संदर्भातली माहिती दिली. (Latur Latest News)

हे देखील पहा -

उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. त्यांना तेथे लिंबाच्या झाडाला गळफास लावलेले मृतदेह दिसून आले व एक छोटी मुलगी तेथे रडत असल्याचे दिसून आले. या मुलीच्या गळ्याला ही इजा झाल्याचे दिसून आले. तसेच झाडाला तुटकी दोरी लोंबकाळत असल्याचे पोलिसांना तपासा दरम्यान दिसून आले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com