Yavatmal News: गरम होतंय म्हणून घरात कुलर लावला, काही क्षणातच अनर्थ घडला; माय-लेकांना मृत्युने कवटाळलं

Yavatmal Mother Son Death: विजेचा शॉक लागून मायलेकांचा मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील दाभडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
Mother and son died on the spot due to Electric shock from cooler incident in Arni taluka
Mother and son died on the spot due to Electric shock from cooler incident in Arni talukaSaam TV

संजय राठोड, साम टीव्ही

Yavatmal Mother Son Death: यवतमाळ जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. घरातील विजेचा शॉक लागून मायलेकांचा मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील दाभडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. कुणाल राठोड आणि वनिता सुनिल राठोड अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या घटनेनं दाभाडी गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

Mother and son died on the spot due to Electric shock from cooler incident in Arni taluka
Buldhana News: मध्यरात्री घरात घुसले, पती-पत्नीचे हातपाय बांधले अन्... बुलढाण्यात ४ ठिकाणी सिनेस्टाईल दरोडा

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याकडे पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली असून उन्हाच्या झळा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी काहीजण फॅन तसेच कुलरचा आधार घेत आहे.

अशातच मंगळवारी रात्रीच्या सुमारास आर्णी तालुक्यातील दाभाडी गावात (Yavatmal News) राहणाऱ्या सुनील राठोड यांनी आपल्या घरात कुलर लावला होता. कुलर सुरू असताना चिमुकला कुणाल हा घरात खेळत होता. दरम्यान खेळता-खेळता कुणाल याने अचानक कुलरला हात लावला.

Mother and son died on the spot due to Electric shock from cooler incident in Arni taluka
Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

त्यावेळी कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. कुलरला हात लावताच कुणालला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी आई वनिताने तातडीने धाव घेतली. मात्र, कुणालला बाजूला करण्याच्या नादात वनितालाही विजेचा जोरदार धक्का बसला.

या घटनेत दोघेही जागीच गतप्राण झाले. एकाचवेळी आईसह मुलाचा मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com