आईने चिमुकलीसह तपोवन एक्सप्रेस समोर मारली उडी; नातेवाईकांचा आक्राेश

आईने चिमुकलीसह तपोवन एक्सप्रेस समोर मारली उडी; नातेवाईकांचा आक्राेश
dead body

-फैय्याज शेख

शहापूर आसनगाव स्थानकात एका महिलेने दोन वर्षांच्या मुलीसह रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. हेमांगी रेपे व संस्कृती रेपे अशी मृतांची नावे आहेत. या मायलेकी हाेत्या. त्या उल्हासनगर येथे रहिवाशी हाेत्या. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची dead नोंद करण्यात आली आहे. (mother-from-ulhasnagar-jumped-on-railway-track-near-asangoan)

मध्यरेल्वेच्या आसनगाव स्थानकानजीक अप सिग्नल जवळ शनिवारी साडे आठच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेस समोर हेमांगी रेपे (२८) या दाेन वर्षाच्या संस्कृती रेपे हिला घेऊन उभ्या राहिल्या. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

रविवारी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली. एक्सप्रेसच्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com