भरधाव वेगानं येणाऱ्या कारने झोपलेल्या माय-लेकीला चिरडलं, चालकाविरोधात गुन्हा

माहूर गडावर कार चालकाने झोपेत असलेल्या माय-लेकीच्या अंगावरून कार घातल्याची धक्कादायक घटना घडलीय.
भरधाव वेगानं येणाऱ्या कारने झोपलेल्या माय-लेकीला चिरडलं, चालकाविरोधात गुन्हा
Accident NewsSaam Tv

नांदेड : येथील माहूर गडावर कार चालकाने झोपेत असलेल्या (Car Accident) माय-लेकीच्या अंगावरून कार (Mother-daughter accident) घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. या अपघातात लक्ष्मीबाई शिवराम खंदारे गंभीर जखमी झाल्या असून त्यांची मुलगी (Shila died) शिला आनंदराव इनकारचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आज गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास देवदेवेश्वर मंदिरा जवळ घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, कारचालका विरोधात पोलीस स्टेशनमध्ये (Police Fir) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News
"वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोगदे तयार केल्यास पर्यावरणाचा आणि पाण्याचा मोठा ऱ्हास होईल"

याबाबत सविस्तर वृत्त असं की, लक्ष्मीबाई, शिला आणि शिलाची मुलगी कोमल हे हदगाव तालुक्यातील कोराडी गावचे रहिवासी आहेत. या तिघीही पाच दिवसांपूर्वी माहुरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवदेवेश्वर मंदीराच्या शेजारी असलेल्या लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये तिघी झोपल्या होत्या.

त्यावेळी समोरून भरधाव वेगानं येणारी कार लक्ष्मीबाई आणि शिला यांच्या अंगावरुन गेली.या भीषण अपघातात लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या तर त्यांची मुलगी शिलाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मीबाईला तातडीनं माहुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.