तान्हुल्याला पोटाला बांधून आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तान्हुल्याला पोटाला बांधून आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
mother

साेलापूर : पतीबरोबर झालेल्या भांडणातून सोलापूर solapur जिल्ह्यातील होटगी hotgi येथील एका विवाहित महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीला पोटाला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आई mother आणि मुलगी daughter या दोघींचा मृतदेह विहिरीवरील पाण्यावर तरंगताना दिसल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची वळसंग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (mother-jumped-in-well-along-with-child-solapur-hotgi-news)

हाेटगी येथे संताेष पटणे दाम्पत्य राहते. हे दोघेही मजुरीची काम करीत. पती संतोष पटणे यांच्या समवेत राचम्मा यांचे भांडण झाले. या रागातून राचम्माने आपल्या सहा वर्षांची मुलगी चैत्राला बराेबर घेऊन नजीकच्या शेत विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

संताेष पटणे यांस मुलगा आणि मुलगी असे अपत्य होते. याप्रसंगी रागाच्या भरात आई राचम्माने फक्त मुलगी चैत्राला सोबत नेले. मुलगा चरण अंगणात खेळत असल्याने त्याला आईने तिथेच सोडून दिल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी सांगितली. कदाचित मुलाला सोबत नेले असते तर आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते अशी चर्चा परिसरात सुरु हाेती.

दरम्यान सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले हे पुढील तपास करीत करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

mother
तृतीयपंथीयांपुढे हात जाेडलेल्या अधिका-याने CS ना केली 'ही' मागणी
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com