
धुळे : तालुक्यातील मोरशेवडी (Dhule) येथे विहिर पाहण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघंही माय-लेक शुक्रवारी दुपारच्या सुमारास विहीर पाहण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान विहीर अचानक खचल्याने दोघा माय-लेकाचा (Mother-son death) ढिघाऱ्याखाली दबून दुर्देवी मृत्यू झाला. सुनिता भिकन पवार (३९) आणि शाम भिकन पवार (१०) अशी मृतांची नावे आहेत. सुनिता आणि शामसोबत त्याचे वडील भिकन पवार हे देखील त्यांच्यासोबत (well incident) विहीरीवर गेले होते. विहिर खचल्यावर भिकन पवार पत्ती आणि मुलासोबत ढिघाऱ्याखाली दबले होते. परंतु, येथील गावकऱ्यांनी भिकनला ढिघाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे मायलेकाचा विहिरीखाली दबून मृत्यू झाला आहे. भिकन पवार यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा विहीर पाहण्यासाठी गेले होते. परंतु, विहीर अचानक खचल्याने तिघेही ढिघाऱ्याखाली अडकले. या दुर्देवी घटनेत भिकनच्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, पत्नी आणि मुलाचा मृतदेह चोवीस तासांनंतर बाहेर काढण्यात आला.
आपल्या शेतामध्ये सुरू असलेल्या विहिरीचे काम बघण्यासाठी तिघेही शेतावर गेले होते. परंतु विहिरीजवळ पोहोचताच अचानक विहीर खचल्याने तिघेही ढिघाऱ्याखाली अडकले.या घटनेत मृत्यू झालेल्या दोघा माय-लेकाचे मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.