Beed: उभ्या बैलगाडीला मोटारसायकल धडकली; दोन जण ठार...

बीडच्या अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावरील दुर्दैवी घटना...
Beed: उभ्या बैलगाडीला मोटारसायकल धडकली; दोन जण ठार...
Beed AccidentSaam tv

बीड - उभ्या असलेल्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल धडकली. या भीषण अपघातात मोटारसायकल वरील 2 जण ठार झाले आहेत. हा अपघात रात्री 8 च्या दरम्यान झाल्याची माहिती समोर येत आहे. बीडच्या (Beed) अंबाजोगाई (Ambajogai) अहमदपूर महामार्गावरील उजनीपाटी जवळ हा अपघात झाला.

हे देखील पाहा -

सुरेश नरहरी गायकवाड वय 45 व शेख जावेद शेख अल्लाबक्ष उर्फ पेंटर वय 38 , दोघे रा. किनगाव अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. धर्मापुरी येथील लग्न आटोपून ते दोघे सायंकाळी दुचाकीवरून किनगावकडे निघाले होते. रात्री 8 च्या दरम्यान उजनीपाटी जवळ आले असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीला त्यांनी पाठीमागून भरधाव वेगात धडक दिली.

Beed Accident
नंदुरबारमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट; आठ शेती पंपाच्या मोटर चोरीला

या अपघातात मोटार सायकल चालक सुरेश गायकवाड व पाठीमागे बसलेले शेख जावेद शेख अल्लाबक्ष ह दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी, तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com