प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन !

लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले होते.
प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन !
प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन !दिनू गावित

नंदुरबार : आज संपुर्ण राज्यात लखिमपूर Lakhimpur घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकार कडून बंद पुकारण्यात आला असतानाच आज नंदुरबार Nandurbar मध्ये पोलिस आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याची परिस्तिती निर्माण झाली होती त्याला कारण होत प्रहार तर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा Union Home Minister Ajay Mishra यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.(Movement on behalf of Prahar Shetkari Sanghatana)

हे देखील पहा -

दरम्यान पोलिसांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या जोडे मारो आंदोलनाचा प्रहार वेळीच आटोक्यात आणल्याने पोलिस प्रशासन व आंदोलकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलन झाल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी संदर्भात निवेदन दिले आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.