'देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यात हिंमत असेल तर...'; खासदार इम्तियाज जलील यांचे खुले आव्हान

Aurangabad News : औरंगाबादेतील पाणी प्रश्नावरून एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे.
'देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यात हिंमत असेल तर...'; खासदार इम्तियाज जलील यांचे खुले आव्हान
MP Imtiaz jaleel criticized on bjp leader devendra fadnavis over water issueSaam Tv

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबादेत पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. शहरात पाणी प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून औरंगाबाद महापालिका प्रशासन आणि जुन्या सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच प्रश्नावर एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांनी उडी घेतली आहे. 'देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या नगरसेवकांच्या वॉर्डात महिलांना एकत्र करा, तेव्हा त्या महिलाच हंड्याने हाणतील, असे खुलं आव्हान एमआयआयचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केलं आहे. (MP Imtiaz jaleel criticized on bjp leader devendra fadnavis over water issue )

हे देखील पाहा -

औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्नावरून खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाणीप्रश्नावरून खासदार जलील यांनी जुने सत्ताधारी भाजपवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. जलील म्हणाले, 'पाणी प्रश्नावर हसावं की रडावं की हे कळत नाही. निवडणुका जवळ आल्या की लोकांना उल्लू बनवण्याचे कधीपर्यंत चालणार, असा सवाल खासदार जलील यांनी केला. 'आता नौटंकी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस येत आहेत. फडणवीस साहेब तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या नगरसेवकांच्या वॉर्डात महिलांना एकत्र करा, तेव्हा त्या महिलाच हंड्याने हाणतील, अस म्हणत खासदार जलील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जलील यांच्या टीकेमुळे औरंगाबादेत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जलील यांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

MP Imtiaz jaleel criticized on bjp leader devendra fadnavis over water issue
विदर्भकरांना मिळणार दिलासा! पावसाच्या शक्‍यतेसह तापमानात होणार मोठी घट!

दरम्यान, औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न चांगलाचं पेटत आहे. काही दिवसांपूर्वी एक सामाजिक कार्यकर्ता पाणीप्रश्नावरून निवेदन द्यायाला जाताना महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याच अंगावर धावला होता. त्यामुळे पालिकेत तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित सुरक्षारक्षकांनी आयुक्त पांडेय यांचा बचाव केला होता. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी दिवसभर कामबंद आंदोलन केले होते. तसेच आयुक्तांच्या अंगावर धावून जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच याच पाणीप्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी शहरात पाणीप्रश्नावरून 'पाणी संघर्ष यात्रा' काढली होती. तसेच मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २५ पत्रे पाठविणार असल्याची घोषणा केली होती. मनसेनं त्यावेळी गेल्या २५ वर्षांपासून पाणी प्रश्न जैसे थे ठेवल्याचा आरोप औरंगाबाद महापालिकेची सत्ता उपभोगलेल्या राजकीय पक्षांवर केला होता.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com