राणा दाम्पत्याच्या अडचणी संपेनात; जामिनानंतर आता 'BMC'चा हातोडा पडणार?

Navneet Rana : रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केल्याचा मुंबई महापलिकेला संशय आहे
राणा दाम्पत्याच्या अडचणी संपेनात; जामिनानंतर आता 'BMC'चा हातोडा पडणार?
Navneet Rana Ravi Rana Latest News Updates, Hanuman chalisa controversy Saam TV

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यासमोरील अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी, त्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीत. आता राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) नोटीस बजावली आहे. मुंबईतील खारमधील निवास्थानाच्या आराखड्यात छेडछाड केल्याचा मुंबई महापालिकेला संशय आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचं पथक राणा दाम्पत्याच्या घरी धडक देणार आहे.

Navneet Rana Ravi Rana Latest News Updates, Hanuman chalisa controversy
'रस्ता बदला, आपण चुकीच्या दिशेने आहोत'; वसंत मोरेंचा WhatsApp स्टेटस व्हायरल

काय आहे प्रकरण?

मुंबईतल्या खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर आमदार रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केल्याचा मुंबई महापलिकेला संशय आहे. इतकंच नाही तर, घर बांधतांना नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार देखील पालिकेला प्राप्त झाली आहे , त्यासाठी पालिका अधिकारी आता राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेने यासंदर्भात रवी राणा यांना आधीच नोटीस बजावली होती. त्या नोटीसनुसार 4 मे रोजी दुपारी 12 वाजता आम्ही तुमच्या घरी तपासणी करण्यासाठी येऊ, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर बीएमसीचं पथक रवी राणा यांच्या घरी दाखल झालं होते. मात्र, घरी कोणीही नसल्याने दरवाज्याला नोटीस चिटवकून हे पथक माघारी परतलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा बीएमसीचे अधिकारी राणा दाम्पत्याच्या घराची तपासणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

राणा दाम्पत्याला अखेर जामीन

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला. मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर करत त्यांना मोठा दिलासा दिला. तब्बल 12 दिवस तुरूंवास भोगल्यानंतर राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.