माझ्या आई-वडिलांचा काय गुन्हा होता? नवनीत राणांच्या मुलीचा प्रश्न (पाहा Video)

MP Navneet Rana's Daughter Criticized To Thackeray Government : आपल्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी राणा दाम्पत्याचा रणवीर हा सहा वर्षांचा मुलगा आणि आरोही ही १२ वर्षांची मुलगी दिल्लीला निघाले आहेत.
माझ्या आई-वडिलांचा काय गुन्हा होता? नवनीत राणांच्या मुलीचा प्रश्न (पाहा Video)
MP Navneet Ranas Daughter Arohi Rana Criticized To Thackeray Government At Nagpur Airportसंजय डाफ

नागपूर: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दाम्पत्य सध्या दिल्लीत आहे. हनुमान चालीसेच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन काही तुरुंगात असल्यामुळे ते आपल्या मुलांना भेटू शकले नव्हते. आता राणा दाम्पत्याची १२ वर्षांची मुलगी आरोही (Arohi Rana) आणि हा वर्षांचा मुलगा रणवीर (Ranveer Rana) हे दोघेही आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत. नागपूर विमानतळावरून (Nagpur Airport) हे दोघे बहिण-भाऊ एकटेच दिल्लीला (Delhi) निघाले. यावेळी मुलगी आरोही राणा हिने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. हनुमान चालीसा वाचल्यामुळे माझ्या आई-वडीलांना कारागृहात टाकलं होतं, त्यांचा काय गुन्हा होता असा सवाल आरोहीने उपस्थित केला आहे. (MP Navneet Ranas Daughter Arohi Rana Criticized To Thackeray Government At Nagpur Airport)

हे देखील पाहा -

राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर ते दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. आता आपल्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी राणा दाम्पत्याचा रणवीर हा सहा वर्षांचा मुलगा आणि आरोही १२ वर्षांची मुलगी दिल्लीला निघाले आहेत. गेल्या २१ दिवसांपासून ते आपल्या आई-वडीलांना भेटले नव्हते. नागपूर विमानतळावरून दोन्ही मुलं एकटीच विमानाने प्रवास करून नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. विमानात बसण्यापुर्वी त्यांनी एका व्हिडिओत दिलेल्या प्रतिक्रियेत ठाकरे सरकारवर टीके केली आहे. राणा दाम्पत्याची १२ वर्षांची मुलगी आरोही म्हणाली की, "हनुमान चालीसा वाचल्यामुळे माझ्या आई-वडीलांना कारागृहात टाकलं होतं. त्यांचा काय गुन्हा होता? त्यांना मी मिस केलं. मात्र आता त्यांना भेटायला आम्ही दिल्लीला चाललोय." असं म्हणत तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.