Navratri : नवनीत राणांच्या ढाेल वादनाने युवा वर्गात चैतन्य

Navratri : नवनीत राणांच्या ढाेल वादनाने युवा वर्गात चैतन्य
navneet rana

अमरावती: सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे पाहायला मिळतो आहे. गत वर्षी काेविड १९ मुळे नवरात्राेत्सवावर सावट होते. यंदा काेविड १९ ची रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात घटल्याने अनेक दुर्गा उत्सव मंडळे नवरात्राेत्सव दणक्यात साजरा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील नवरात्राेत्सव मंडळांना भेटी देत गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला होता. mp-navneet-ravi-rana-enjoyed-playing-dhol-tasha-amravati-latest-news-sml80

navneet rana
कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे

आता खासदार राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देताना एका मंडळात ढोल-ताशा वाजवून भाविकांचा उत्साह वाढविला. खासदार नवनीत राणा यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही हे पाहून युवा वर्ग देखील त्यांना साथ देऊ लागला. कमरेला ढोल बांधून ढोल खासदार राणा यांनी सर्वांनाच चकीत केले.

कौशल्यपूर्ण ढोल वादनामुळे खासदार राणा यांचा हा अंदाज पाहण्यासाठी भाविकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान शासन नियमांचे पालन करून कोरोनापासून आपला बचाव करावा असे आवाहनही खासदार राणा यांनी यावेळी उपस्थित भाविकांना केले. भाविकांनी काेविड १९ चे लसीकरण करुनच उत्सवात सहभागी घ्यावे असेही राणांनी navneet rana नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.