Sujay Vikhe Patil Dance : खासदार सुजय विखे पाटलांचा 'मैं हूं डॉन' गाण्यावर तुफान डान्स; व्हिडिओ व्हायरल

Shirdi News : सुजय विखे पाटलांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Sujay Vikhe Patil Viral Dance
Sujay Vikhe Patil Viral DanceSaam Tv

Sujay Vikhe Patil Viral Dance News : शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काही नेत्यांनी तसेच कलाकारांनी देखील हजेरी लावली. (Latest Marathi News)

Sujay Vikhe Patil Viral Dance
Pandharpur News : हेडफोन लावून गाणी ऐकणे बेतले जीवावर; रेल्वेच्या धडकेत युवक ठार

यादरम्यान भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे यांनी हास्यकलाकार गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत 'वन-टू- का फोर आणि आणि मैं हूं डॉन' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी गाण्याच्या तालावर मनमुराद डान्स केल्याचं या व्हिडीओत दिसतंय. तर उपस्थितांनी देखील एकच जल्लोष करत विखे यांच्या डान्सला दाद दिली.

गौरव मोरेने सोशल मीडियावर शिर्डीतील कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये गौरव आणि सुदेश भोसले हे डान्स करताना दिसत आहेत. शिर्डी महोत्सव 2023 ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढं वय आहे तेवढा अनुभव असलेले सुधेश सर यांच्यासोबत मंच शेयर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतोअसे कॅप्शन गौरव मोरेने केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com