कंगना राणावतचा बोलविता धनी भाजप आणि RSS ; खासदार धानोरकर

एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते भडकून देत आहेत अशीही टीका खासदार सुरेश धानोरकर यांनी केली आहे.
कंगना राणावतचा बोलविता धनी भाजप आणि RSS ; खासदार धानोरकर
कंगना राणावतचा बोलविता धनी भाजप आणि RSS ; खासदार धानोरकरSaam TV

संजय राठोड

यवतमाळ : कंगना राणावतच्या वक्तव्याने सध्या देशात वादंग निर्माण झाला आहे. 2014 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाला असल्याचं वक्तव्य कंगनाने केलं. ते वक्तव्य तिच नसून भाजपाचं वक्तव्य आहे. ते वक्तव्य RSS चं आहे. कंगनाच्या विरोधामध्ये या देशातील सर्व पक्ष बोलत आहेत. परंतु भाजपचा एकही नेता साधा एक शब्दसुद्धा बोलत नाहीये. याचा अर्थ कंगनाचा बोलवता धनी जर कुणी असेल तर ते फक्त भाजप आणि आर.एस.एस आहे अशी टीका खासदार धानोरकर यांनी केली आहे. जुना देशाचा इतिहास पुसण्याचा काम भाजप आणि आर.एस.एस करत आहे.

कंगना राणावतचा बोलविता धनी भाजप आणि RSS ; खासदार धानोरकर
उल्हासनगरमध्ये पती- पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

भाजप आणि आर.एस.एस.चे स्वातंत्र्यमध्ये कुठेहे योगदान नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांचा अपमान करण्याचा काम भाजप कंगना राणावतच्या माध्यमातून करीत आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर तिच्या विरोधामध्ये खटला दाखल करणार असल्याचंही धानोरकर म्हणाले. कंगना राणावतला पद्मश्री अवॉर्ड द्यायचं आणि या देशाचा इतिहास पुसण्याचा काम हे भाजपा राजवटीमध्ये होत आहे ते अतिशय लज्जास्पद बाब असल्याची टीका राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केली आहे.

एसटी संपा मागे भाजपा आहे. जनतेला वेठीस धरण हे काही योग्य नाही. साधारणतः तीन हजार कर्मचारी घरी बसले आहे सस्पेंड झालेले आहे. काही कर्मचारी रोजंदारीवर होते. त्यांनाही घरी बसवलं हे फक्त भाजपा मुळे होत आहे. भाजपा ने विकासात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी कुठलेही काम केले नाही फक्त महाविकास आघाडी सरकरला बदनाम करायचा उद्योग भाजपा ने सुरू केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी भाजप नेत्यांच न ऐकता सरकार सोबत सकारात्मक चर्चा करावी प्रश्न महाविकास आघाडी सरकार सोडवल्या शिवाय राहणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com