Udayanraje Bhosale : 'भर चाैकात त्यांना चप्पलनं मारलं पाहिजे'; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

या गुन्ह्याचा तपास पाेलीस कर्मचारी सणस करीत आहेत.
satara, crime news, bjp corporator , udayanraje bhosale, shahupuri police
satara, crime news, bjp corporator , udayanraje bhosale, shahupuri policesaam tv

Satara : सातारा पालिकेच्या माजी उपाध्यक्षा आणि त्यांचे पती यांना मारहाण केल्याने भारतीय जनता पक्षाचे (bjp) माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यावर शाहूपूरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलीसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार ही घटना किरकाेळ वादातून झाली. दरम्यान जांभळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे अशी माहिती पाेलीस ठाण्यातून मिळाली. (Satara Latest Marathi News)

जांभळे यांच्या विराेधात पाेलीसांना दिलेल्या तक्रारीत पालिका सफाई कर्मचारी यांना माजी उपाध्यक्षांच्या पतीने कचरा काढण्याचे काम साेडून रांगाेळी का काढत आहात असा प्रश्न विचारला, त्यावेळी तेथे जांभळे आले आणि त्यांनी तुझा काय संबंध असे म्हणत वाद घातला तसेच मारहाण केली. त्यावेळी माझी पत्नी काय झालं म्हणून पाहण्यास आली तर तिला देखील शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानूसार पाेलिसांनी जांभळेंवर गुन्हा दाखल केला आहे.

satara, crime news, bjp corporator , udayanraje bhosale, shahupuri police
Kass : तिढा सुटला; राजेंची मागणी मान्य, कास पठार ई बस 'येथून' धावणार

दरम्यान या घटनेची माहिती समजताच खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी माजी उपाध्यक्षांच्या निवासस्थानी भेट दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती घेत माध्यमांशी बाेलताना महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला पुरुषार्थ समजत असाल तर मी एकएकाकडे बघतो. ही दमदाटी खपवून घेणार नाही. अशा प्रवृत्ती लाेकांनी ठेचून काढायला हव्यात. भर चाैकात चप्पलनं मारलं पाहिजे असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

satara, crime news, bjp corporator , udayanraje bhosale, shahupuri police
Love : अख्या साता-यात रंगलीय त्याच्या प्रेमाची चर्चा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com