
सातारा : सातारा (Satara) आणि कराड (Karad) येथून दररोज पुणे (Pune) येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या निश्चितच मोठी आहे. या मार्गावर नोकरीच्या वेळेत शटल सेवा सुरु केल्यास (mp udayanraje bhosale demands to begin pune satara karad train) रेल्वेला नवीन उत्पन्न मिळण्याबरोबरच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा शिण वाटणार नाही तसंच त्यांचा वेळही वाचेल यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी सूचना खासदार उदयनराजे भाेसले (MP Udayanraje Bhosale) यांनी रेल्वे प्रशासनास केली आहे.
पुणे रेल्वे विभागाच्या डिआरएम रेणु शर्मा यांचेसमवेत भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालयाच्या कार्यालयात खासदार उदयनराजे भाेसले यांनी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेत भारतीय रेल्वे प्रशासनाशी निगडीत पुणे विभागातील सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. त्यावेळी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी रेल्वे प्रशासनास विविध सूचना केल्या.
ट्रेन नंबर १२६३० कर्नाटका संपर्क क्रांती व्हाया पुणे-सातारा (pune ) जाणाऱ्या गाडीला सातारा (satara) येथे २ मिनीटांचा थांबा हा सैन्यदलातील लोकांसाठी आवश्यक आहे. कोरोनाने इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय वाढली आहे. येथुन पुढे इंटरनेटवरच सर्व काही होणार आहे. त्यासाठी लहान स्थानकावर ऑनलाईन तिकिट सेवा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था झाली पाहीजे अशी सूचना खासदार भाेसले यांनी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.