
Vinayak Raut News : अकोला (akola), शेवगावात (shevgaon) जातीय तेढ निर्माण करायला भाजपची (bjp) साथ मिळत आहे असा गंभीर आराेप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी केला आहे. जातीय तेढ निर्माण करू भाजप आणि शिंदे (cm eknath shinde) राजकीय पोळी भाजून घेताहेत असेही खासदार राऊत यांनी नमूद केले. (Maharashtra News)
कर्नाटकमध्ये जनता कि बात कळली. आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपला शेवटच्या स्तरापर्यंत उतरावे लागते, हे भाजपचे दुर्दैव असल्याचे खासदार राऊतांनी नमूद केले. ते म्हणाले पक्ष सावरण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्लीत फिरत आहेत. मुंबई मनपासह सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लगेच घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवेल असा विश्वास देखील खासादर विनायक राऊत यांनी कर्नाटकच्या निकालावर बाेलताना व्यक्त केला.
दरम्यान ईडीच्या नाेटीसबाबत बाेलताताना राऊत म्हणाले जयंत पाटील (jayant patil ed notice) हा सज्जन माणूस आहे. खरंतर जयंत पाटलांना त्रास दिला जात आहे असे सांगताना राऊत यांनी समीर वानखेडेच्या (sameer wankhede) माध्यमातून भाजप खंडणी कशी उकळत होते हे वारंवार सांगितले गेले. भाजपचा एक नेता समीर वानखेडेच्या माध्यमातून खंडणी उकळून त्याला पाठीशी घालत होता असा आराेप राऊत यांनी केला.
नितेश राणे (nitesh rane) यांना भाजपने भुकण्यासाठी ठेवले आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर केलेल्या टिकेवर विनायक राऊत यांनी प्रत्युउत्तर दिले. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्याबाबतीत रविवारी नपुसंकचं विधान केले.
त्याला भाजपने वेळीच आवार घालावे. भाजपने याला आवर न घातल्यास भाजपचे अधपतन होईल असेही राऊत यांनी म्हटलं. दरम्यान नारायण राणे (narayan rane) यांच्या काळात खून झाले त्याची देखील देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.