मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा तंत्रस्नेही शिक्षक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार
मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कारदिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मंचर : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे-शिंदे यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा दोन हजार एकोणीस या वर्षाचा तंत्रस्नेही शिक्षक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने आंबेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Mrinal Ganjale-Shinde Gets National ICT Award

हे देखील पहा -

राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने मृणाल गांजाळे-शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार यांना देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, महाळुंगे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कांतीलाल दंडवते व माता-पालक संघाच्या वतीने लोकविश्व प्रतिष्ठानच्या सचिव सुवर्णा सचिन तोडकर यांच्या हस्ते मृणाल गांजाळे-शिंदे यांचा सत्कार देखील आज करण्यात आला.

मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार
पंकजा मुंडेंनी घेतली संभाजीराजेंची सदिच्छा भेट

प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना मृणाल गांजाळे–शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचात तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करत तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळे नावीन्यपूर्ण व सकारात्मक प्रयोग केले. यामध्ये ऑनलाईन शिक्षण, इतर देशातील शाळांशी व विद्यार्थ्यांशी थेट संवाद, वेबसाइट व मोबाईल अप्लिकेशनचा शालेय शिक्षणात प्रभावी वापर, राज्यातील व परराज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले.

विशेष म्हणजे मृणाल गांजाळे-शिंदे यांच्या मार्गदर्शनातम २०१९-२० या वर्षात इयत्ता पाचवी मध्ये सतरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले तर सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना तंत्रस्नेही शिक्षक हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com