महावितरणची वीजचोरांवर करडी नजर; विटा विभागात 81 आकडेबहाद्दरांवर कारवाई
Sangli NewsSaam Tv

महावितरणची वीजचोरांवर करडी नजर; विटा विभागात 81 आकडेबहाद्दरांवर कारवाई

दरमहा साधारणपणे 5 लाख रूपयांची चोरी हे आकडेबहाद्दर करीत होते.

सांगली - महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. महावितरणने (MSEDCL) वीजवाहिन्यांवर सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. सांगली मंडळातंर्गत विटा विभागातील कडेगाव शाखा कार्यालयाच्या विहापूर व शाळगावातील 81 आकडेबहाद्दरांवर कारवाई केली. वीजचोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल्स, पेट्या इ. साहित्य जप्त केले. दरमहा साधारणपणे 5 लाख रूपयांची चोरी हे आकडेबहाद्दर करीत होते.

हे देखील पाहा -

वाढत्या वीजचोरीचा फटका महावितरणच्या महसूलासह प्रमाणिक ग्राहकांना बसतो. वीजचोरीमुळे वीजयंत्रणेवरील भार वाढून रोहित्र जळणे, कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, प्रसंगी वीजअपघात अशा समस्या ओढवतात. यापुढील काळात वीजचोरीविरोधात सातत्यपुर्ण कारवाई करण्यात येणार आहे. विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीजचेारी हा गुन्हा आहे.

Sangli News
कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशात 13 हजार 216 नवीन कोरोनाबाधित

वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी वीजवापराच्या तीनपट ते सहापट आर्थिक दंडाची व सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत तुरूंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. तेव्हा अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीजेचा वापर करावा, असे महावितरणचे आवाहन आहे.विहापूर व शाळगावात राबविण्यात आलेली वीज चोरी मोहिम कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता शशिकांत पाटील, सहाय्यक अभियंता प्रितेश सोनार व वीज कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com