
Women's Day Special: जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्वत्र महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहे. एक महिला तिच्या आयुष्यात सर्व भूमिका जबाबदारीने पार पाडते. मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी बाजूला सारत महिला नेहमीच कुटुंबाला पुढे घेऊन जाते. आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे. मात्र तरी देखील अनेक कामांमध्ये महिलांना डावलण्यात येते. अशात एका महिलेने केलेल्या कामाचा चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुला येणार नाही, तु मुलगी आहेस... असं बोलणाऱ्यांच या महिलेने तोंडच बंद केलं आहे. (Latest MSEDCL News)
गावात, शहरात,परिसरात कधीही लाईट गेल्यावर नागरिक लगेच महावितरण कंपनीला फोन करतात. अशात झालेला बिघाड दुरुस्त करून पुन्हा विद्यूत प्रवाह सुरळीत करणे हे इलेक्ट्रीशयनचं काम असतं.आपला जीव धोक्यात टाकून विजेच्या खांबावर चढून काम करताना आजवर तु्म्ही अनेक माणसांना पाहिलं असेल. मात्र हे काम आता चक्क एक महिला देखील करत आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता ही महिला सरसर विजेच्या खांबावर जाते. नंतर वरती झालेला बिघाड पाहून ती तो दुरुस्त देखील करते. या महिलेची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. महावितरण कंपनीने त्यांच्या ट्वीटर अकाऊटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच कॅप्शन देत लिहिलं आहे की, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांच्या घरामध्ये सदैव प्रकाश राहो असा विचार करणारी ती म्हणजे 'लाईनवुमन'!जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महावितरण कंपनीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
महिला घर आणि तिचं काम अशा दोन्ही गोष्टी व्यवस्थीत संभाळते. मनामध्ये एखादी गोष्टी ठरवली तर महिला ती पूर्ण करतातचं हे या 'लाईनवुमन'ने दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर महिलेच्या कामगिरीचे, धाडसाचे आणि ताकतीचे कौतुक होतं आहे. विजेच्या खांबावर चढून काम करण्यास भलेभले मागे हटतात. मात्र महिलेने आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, आपल्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना वीज मिळणार आहे, असं म्हणत विजेची दुरुस्ती केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.