ओ शेट...वीज पुरवठा दिलाय थेट! वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अनोखा फंडा

या गाण्याचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे.
ओ शेट...वीज पुरवठा दिलाय थेट! वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अनोखा फंडा
ओ शेट...वीज पुरवठा दिलाय थेट! वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अनोखा फंडाजयेश गावंडे

अकोला - ग्राहकांना वारंवार सूचना देऊनही थकलेले वीज बिल Electricity Bill भरत नाही. त्यामुळे विज बिल वसुलीसाठी जनजागृती करीता महावितरणचे कामगिरीचा फंडा चांगला गाजत आहे. अकोट कला मंचने बनवलेला "ओ शेट....वीज पुरवठा दिला थेट..आमचा जनमित्र लय आहे ग्रेट!" या गाण्याचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे.

हे देखील पहा -

अकोट येथील महावितरणचे कार्यालयात गांधी जयंती साजरी करीत या जनजागृती व्हिडीओचे लाईव्ह विमोचन राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज व उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या काळात आँक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला पण महावितरण ने अविरत सेवा दिली. पण थकबाकी वळल्याने ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केल्या जात आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडित केल्यानंतर विज बिल आणि पुन्हा जोडणी शुल्क भरून वीज पुरवठा जोडला जात आहे.

ओ शेट...वीज पुरवठा दिलाय थेट! वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अनोखा फंडा
IT Raid: आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

थकबाकीदार ग्राहकांनी विज बिल भरावे आणि वीज पुरवठा खंडित करण्याकरिता याकरीता सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान विज बिल वसुली बाबत ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटु कार्यवाही ताळावी तसेच महावितरणची कामगिरीची माहीती विशद करीत, विज बिल भरणा केंद्रासह इतर लाईव्ह व्हिडीओ सामाजिक जनजागृती म्हणून अकोट कला मंचने प्रस्तुत केला आहे. या व्हिडीओ मधील काल्पनिक पात्र ग्राहक सेठ व तयार केलेले गाण सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे. सामाजिक जनजागृती म्हणून महावितरण कर्मचारी योगेश वाकोडे यांनी व्हिडीओची निर्मिती केली. तर अरुण दावले यांनी गित लिहले असुन महेंद्र सोनोने यानी गित गायिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.