प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याने एसटी चालकावर गुन्हा दाखल

msrtc bus
msrtc busmsrtc bus

जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असणा-या श्रीष्टी येथे पुराच्या पाण्यातून बस msrtc bus मार्गस्थ करणे राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाच्या अंगलट आले आहे. प्रवाशांचा जीव धाेक्यात घातल्याचे कारणाने बस चालकावर गुन्हा नाेंद झाला आहे.

msrtc bus
२५०० रुपयांत मुबंई ते सिंधुदुर्ग प्रवास; जाणून घ्या विमानाची वेळ

श्रीष्टी येथील कसुरा नदीच्या पुलावरील पाण्यातून बस चालवत नेल्याने पुराच्या पाण्याच्या वेगाने बस पुलावरच पलटली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. या प्रकरणी डेपो मॅनेजर यांच्या तक्रारीनूसार आष्टी पोलिसांनी चालकावर गुन्हा नाेंद केला आहे.

डेपाे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीत निष्काळजीपणे रस्त्याचा परिस्थितीचा अंदाज न घेता दुर्लक्ष केल्या प्रकरणी चालकाने स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस पुलावरून नेल्याची म्हटलं आहे. संबंधित चालकावर कलम २७९,४२७ तसेच मोटार परिवहन विभाग कायदा कलम १३४,अ, ब,/१७७ व १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागवे हे अधिक तपास करत आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com